कोथंबीर लागवडीची नियोजन Cultivation Of Coriander Best 6 Points

Cultivation Of Coriander

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कोथिंबीर ची लागवड करून कशाप्रकारे चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवू शकतो. कोथिंबीर चा वापर हा घरात, हॉटेलमध्ये, लग्न समारंभ व इतर कार्यक्रमात जेवण बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात होत असल्याने कोथिंबीरीला वर्षभर चांगली मागणी असते. कोथिंबीर ची लागवड ही प्रामुख्याने पावसाळी व हिवाळी हंगामात केली जाते. उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर चे उत्पन्न कमी निघत असले तरी मागणी प्रचंड असल्याने बाजारात चांगला भाव मिळतो. त्यामुळे बरेच शेतकरी उन्हाळ्यात देखील कोथिंबीर लागवड करत असतात.

जमीन:-
कोथिंबीर च्या लागवडीसाठी मध्यम, कसदार आणि मध्यम खोलीची जमीन योग्य असते. परंतु जमिनीत सेंद्रिय खत जास्त प्रमाणात असतील तर हलक्या किंवा बारीक कसदार असलेल्या जमिनी देखील कोथिंबीर लागवड करू शकतात.

👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌

हवामान:-
कोथिंबीर ची लागवड ही कोणत्याही हवामानात करू शकतात. परंतु अति पाऊस किंवा अति उन असेल तर कोथिंबीरची वाढ हवी तशी होत नाही. आधी सांगितल्याप्रमाणे उन्हाळ्यात कोथिंबीरची वाढ कमी असते पण मागणी जास्त असल्याने बाजारात भाव चांगला असतो. त्यामुळे पाण्याची उपलब्धता असेल तर उन्हाळ्यात देखील कोथिंबीर लागवड करून जास्त नफा मिळवता येतात.

लागवड पद्धत:-
कोथिंबीर ची लागवड करण्याआधी जमीन नांगरून व कुळवून चांगली भुसभुशीत करून घ्यावी. जमिनीत एकरी सहा ते आठ टन चांगले कुजलेले शेणखत घालावे त्यानंतर तीन बाय दोन मीटर आकाराचे सपाट वाफे तयार करावे. आपण या वाफ्यात बी फेकून लागवड करू शकतो. बी फेकून लागवड करताना बी सारखे पडेल याची काळजी घ्यावी. बी फेकून लागवड करायची नसेल तर वाफेमध्ये 15 सेमी अंतरावर खुरप्याने ओळी पाडून त्यात बी पेरू शकतो.

उन्हाळ्यात कोथिंबीर लागवड करायची असेल तर पेरणी आधीच वाफे भिजवा आणि मग वापसा आल्यानंतर त्यात बी फेकून किंवा ओळी पाडून त्यात बी टाकून पेरणी करावी. कोथिंबीर लागवडीसाठी एकरी २५ ते ३५ किलो बियाणे लागते. लागवडी आधी धने हळुवार रगडून फोडून घ्यावेत व त्यातील बी वेगळे करावे. तसेच पेरणीपूर्वी धन्याचे बी भिजवून मग गोंडपाटात गुंडाळून ठेवा त्यामुळे उगवण आठ ते दहा दिवसात होते व कोथिंबीरच्या उत्पादनात वाढ होते. त्याच सोबत काढणी देखील लवकर होते.

Cultivation Of Coriander

खत व पाणी व्यवस्थापन:-
कोथिंबीर लागवडी आधी जमीनीत एकरी सहा ते आठ चांगले कुजलेले शेणखत घालावे. बी उगवल्यानंतर वीस दिवसानी हेक्टरी 40 किलो नत्र द्यावे. त्याचसोबत 25 दिवसांनी शंभर लिटर पाण्यात अडीचशे ग्रॅम युरिया मिसळून दोन फवारण्या करू शकतात. त्यामुळे कोथिंबिरीची वाढ चांगली होते. कोथिंबीर पिकाला नियमित पाणी गरजेचे असते. उन्हाळ्यामध्ये दर पाच दिवसांनी तर हिवाळ्यामध्ये आठ ते दहा दिवसांनी पाणी द्यावे.

कीड व रोग व्यवस्थापन:-
कोथिंबीर पिकावर रोग व किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो. कधी कधी मर, भुरी या रोगांचा प्रादुर्भाव दिसतो. अशावेळी शिफारशीनुसार भूर रोगासाठी भुरी प्रतिबंधक वापरू शकतात. तसेच पाण्यात विरघळणारे गंधक वापरावे.

काढणी व उत्पादन:-
पेरणीनंतर 35 ते 40 दिवसांनी कोथिंबीर पंधरा ते वीस सेमी उंचीची होते. त्यावेळी ती उपटून किंवा कापून काढणी करावी. पेरणीच्या दोन महिन्यानंतर कोथिंबीरला फुले यायला सुरुवात होते. त्यामुळे त्याआधीच काढणी करणे महत्त्वाचे आहे. पावसाळी आणि हिवाळी हंगामात हिरव्या कोथिंबिरीचे एकरीस चार ते सहा टन उत्पादन मिळते तर उन्हाळी हंगामात हेच उत्पादन अडीच ते साडेतीन टन मिळते.

Cultivation Of Coriander

👉👉More Updates Join Whatsapp Group👌👌

Leave a Comment