श्रावणातील रानभाज्यांचे औषधी गुणधर्म Shravanatil Ranabhajya top 6

Shravanatil Ranabhajya

नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत श्रावणातील रानभाज्यांचे औषधी गुणधर्म. पावसाळ्यातील वातावरण हे दमट , ओलसर आणि त्यामुळे आरोग्यदायी नसते. अशा वातावरणात आरोग्यदायी आणि रुचकर आहार घेण्याची सर्वांचीच गरज असते. निसर्गतःच म्हणजे वातावरणामुळे शरीरात वातदोष वाढतो आणि भूकही मंदावत असते. त्यात मांसाहारी पदार्थ तर पचनक्रिया बिघडू शकतात. म्हणूनच श्रावणात शाकाहार कधीही चांगला. तसाही पावसाळ्यात पचायला हलका असाच आहार घ्यावा. आपल्या आरोग्याच्या या दृष्टीने या चार महिन्यात आंबट, खारट आणि मधुर पदार्थांचे सेवन करावे. आणि या दिवसात शेतात अशा चवीच्या रानभाज्या आढळतात. अशाच श्रावणातल्या रानभाजींचे काही महत्त्व जाणून घेऊया.

Shravanatil Ranabhajya

चुका :- कोवळी पाने , फांद्या भाजी म्हणून वापरतात. या भाजीची चव आंबट गोड असते.
औषधी गुणधर्म
भाजी मुळे वात दोष कमी होतो. भाजी पचनास हलकी असल्याने पचनक्रिया सुधारते. चुका थंड असल्याने हातापायाची जळजळ कमी होते तसेच डोकेदुखीवर चुका आणि कांद्याचा रस चोळावा. चुकाच्या पानांचा रस दात दुखीवर उपयुक्त आहे.

भारंगी:-
भारंगीच्या पानांची भाजी करतात . भारंगीची झुडपे डोंगर उतारावर आढळतात.

भारंगी चे औषधी गुणधर्म
भारंगी च्या पानांची भाजी दमा या विकारावर फायदेशीर आहे.

👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌

कॅल्शियमची भूमिका

हादगा
हादगाच्या फुलांची आणि शेंगांची भाजी करतात. हादग्याची फुलर पांढरी किंवा पिवळसर असतात.

हादगाचे औषधी गुणधर्म
वात, कफ आणि पित्ता दोषात ही भाजी गुणकारी आहे.

तांदूळजा
पानांची आणि कोवळ्या देठांची भाजी करतात.
लालसर हिरव्या रंगाची पाने असतात.
औषधी गुणधर्म
पचनास हलकी असल्याने पचनक्रिया सुधारते.

चिवळ
या भाजीला रानघोळ असे म्हणतात. पाने व कोवळे देठ भाजीसाठी वापरतात. ही भाजी जमिनीलगत पसरत वाढते. या भाजीची फुले पिवळ्या रंगाची असतात.
औषधी गुणधर्म
ही भाजी मुळव्याधी व मुतखड्यावर गुणकारी आहे.

करडोली
हिरवट पिवळ्या रंगाची काटेरी फळे भाजीसाठी वापरतात. हे वेलवर्गीय शेताच्या बांधावर किंवा डोंगर उतारावर आढळतात.
औषधी गुणधर्म
जीवनसत्व ब जास्त असल्यामुळे गरोदर स्त्रियांसाठी उपयुक्त आहे. जीवनसत्व अ जास्त दृष्टीदोष यामध्ये उपयुक्त.
मुतखड्यावर गुणकारी आहे.
पचनशक्ती वाढण्यास मदत करते.

👉👉More Updates Join Whatsapp Group👌👌

Shravanatil Ranabhajya

Leave a Comment