तुर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे व्यवस्थापनBenefit of pigeon pea management best 0

Benefit of pigeon pea management

तूर हे डाळवर्गीय पिकापैकी एक प्रमुख पीक असून त्यामध्ये कमी उत्पादकतेच्या अनेक कारणांपैकी किडींमुळे होणारे नुकसान हे प्रमुख कारण आहे. महाराष्ट्रात मुख्यतः खरीप हंगामात तूर, मूग व उडीद ही प्रमुख कडधान्य पिके घेतली जातात. कडधान्यांमध्ये तूर हे महत्त्वाचे पीक आहे तुरीमध्ये प्रथिनाचे प्रमाण 21 ते 23 टक्के असते.

या पिकावर पीक वाढीच्या काळात किडीचा तसेच रोगांचा उपद्रव आढळून येतो. या कीड आणि रोगांचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे असते. अन्यथा उत्पादनात फार मोठ्या प्रमाणात घट दिसून येते. तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीपासून पिकाचे 30 ते 40 टक्के नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी जागरूक राहून किडीची ओळख करून पिक संरक्षण खर्चात बचत करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन तंत्राचा वापर करणे फायद्याचे ठरते.

या किडीला हेलीकोव्हरपा अळी, अमेरिकन बोंड आळी आणि हरभऱ्यावरील घाटे अळी म्हणून सुद्धा ओळखले जाते. ही किड बहुभक्षी असून डाळवर्गीय पिकामध्ये उडीद, मूग, हरभरा, वाटाणा आणि मसूर या पिकांवर आढळते. शेंगा पोखरणारी अळी. इंग्रजी नाव : pod borer.

Benefit of pigeon pea management

जीवनक्रम व नुकसान प्रकार :-

शेंगा पोखरणारी अळी हेलिकोव्हरपा या नावाने ओळखले जाते. या अळीचा जीवनक्रम चार ते पाच आठवड्यात पूर्ण होतो. या अळीच्या सुमारे वर्षातून सात ते नऊ पिढ्या तयार होतात.

१) मादी कोवळी पाने कळ्या फुले तसेच शेंगावर अंडी घालते. एक मादी सरासरी 800 अंडी घालते.

२) चार ते सात दिवसांनी अंड्यातून अळी बाहेर येते आणि रंगाने हिरवट, पिवळसर असून अंगावर तुरळक समांतर रेषा असतात.                    अंड्यातून बाहेर पडलेली अळी कोवळी पाने, कळ्या व शेंगांना छिद्र पाडून आतील दाणे खाते. शेंगांना मोठे छिद्र पाडून आत शिरते. अळी तिचे अर्धे शरीर बाहेर व अर्धे आत ठेवून आतील दाणे खाते. तसेच एक अडी सुमारे 30 ते 40 शेंगांना नुकसान करून आपली अवस्था पूर्ण करते.

3) 14 ते 16 दिवसांपर्यंत अळीची पूर्ण वाढ होऊन त्या झाडाच्या बुंध्याजवळ जमिनीत मातीच्या वेष्ठनात कोषा अवस्थेत जातात. हीअवस्था हवामानानुसार एका आठवडा ते एक महिन्यापर्यंत असू शकतो.

4) किडीचा पतंग दणकट, पिवळसर तपकिरी रंगाचा असतो.

👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌

प्रादुर्भावास अनुकूल हवामान व परिस्थिती

या किडीचा प्रादुर्भाव पीक
रोपावस्थेपासून ते काढणीपर्यंत आढळून येतो. कोरड्या, उष्ण, दमट, ढगाळ वातावरणात असल्यास या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो.

एकात्मिक व्यवस्थापन तंत्र

१) शेंगा पोखरणारी अळीच्या सर्वेक्षणासाठी सापळ्यामध्ये लुपरचा वापर करावा. शेतात प्रति हेक्टरी १० कामगंध सापळे बांबूच्या सहाय्याने पिकाच्या उंचीपेक्षा अधिक उंचीवर अडकवावे. त्यामुळे नर पतंग कामगंध सापळ्यामध्ये आकर्षित होतात. शेताच्या बांधावरील तुरीच्या शेंगा पोखरणारी अळीची पर्यायी खाद्यतण उदा. कोळशी, रानभेंडी, पेटारी, ही तणे वेळोवेळी काढून नष्ट करावी.
2) शेतात प्रति हेक्टरी 50 ते 60 पक्षीथांबे इंग्रजी ऊ आकाराचे उभारावे. त्यामुळे त्यावर पक्षी मोठ्या प्रमाणात बसतील व अळ्या वेचून नेतील.
३) अळ्या हाताने वेचून त्यांचा नाश करावा. अळ्याचा प्रादुर्भाव जास्त वाढल्यास तुरीच्या झाडाखाली पोते अंथरून तुरीचे झाड हलवावे आणि पोत्यावर पडलेले अळ्यांचा वेचून नाश करावा.
४) वनस्पतीजन्य कीटकनाशक पिकास फुलकळी येताना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 5% निंबोळी अर्काचा किंवा निंबयुक्त कीटकनाशक अझाडीरेक्टीन ची पहिली फवारणी करावी.
५) जैविक कीटकनाशक- तुरीला 50% फुलोरा आल्यानंतर एक मिली प्रति लिटर पाण्यातून या विषाणूजन्य कीटकनाशकाची फवारणी करावी.
६) वरील वनस्पतीजन्य किंवा जैविक फवारणीनंतरही घाटे अळीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास, किडीने आर्थिक नुकसान संकेत पातळी गाठल्यानंतर रासायनिक कीटक नाशकांचा वापर करावा.

👉👉More Updates Join Whatsapp Group👌👌

Benefit of pigeon pea management

Leave a Comment