ब्रोकोली लागवड : Planting broccoli best 0

Planting broccoli

नमस्कार शेतकरी मित्रांनो , आज आपण पाहणार आहोत कशाप्रकारे ब्रोकोली या भाजीपाल्याची लागवड केली जाते. ब्रोकोली ही वास्तविक परदेशातून आली पण भारतीयांच्या किचनमध्ये घर करून गेली. ब्रोकोली ही जरी विदेशी पीक असले तरी त्याची शेती भारतीयांसाठी एक वरदान ठरू शकते. कारण भारतीयांच्या आहारात आता ब्रोकोली चा वापर वाढत चाललाय. त्याचे कारण असे की ब्रोकोली मध्ये असणारे जीवनसत्वे.

ब्रोकोली ही स्वादिष्ट भाजीपाल्यापैकी एक आहे. जे कोबी वर्गी पिकांशी संबंधित आह. ब्रोकोली चा वापर भारतीयांच्या आहारात फ्लॉवर प्रमाणेच केला जातो. ब्रोकोलीच्या गड्ड्याची फ्लॉवर प्रमाणे भाजी बनवली जाते. ब्रोकोली मध्ये प्रथिने, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट, लोह, विटामिन ए, सी आणि इतर अनेक पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात. यात असलेले पोटॅशियम कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू देत नाहीत. विटामिन सी पुरेशा प्रमाणात आढळते आणि विटामिन सी शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील मदत करते. गरोदर महिलांनी गरोदरपणात याची सेवन करावे असा सल्ला देखील दिला जातो. ब्रोकोली मध्ये फॉस्फरस, मॅग्नेशियम, लोह, कॅल्शियम आणि झिंक देखील भरपूर प्रमाणात आहे. ब्रोकोली शरीराला पुरेसे प्रमाणात मिळाल्यास हाडे मजबूत होतात. ब्रोकोली हे सलाज मध्ये कच्चे खाल्ले जाते. ब्रोगोलीची शेती ही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी संजीवनीच काम करू शकते. कारण की ग्रामीण भागात ब्रोकोलीची लागवड अजूनही फारशी प्रचलित नाही.

👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌

Planting broccoli

ब्रोकोली ची लागवड पद्धत :-
हरितगृह, पॉलिहाऊस तसे शेडनेट खाली याचे पीक घेता येते. सध्या ब्रोकोली हायड्रोपोनिक पद्धतीने वाढवण्याची पद्धत चांगली मानली जाते. त्यामुळे लागवडीचा खर्च देखील कमी होईल आणि उत्पादन देखील चांगले होईल. ब्रोकोली च्या भाजीपाल्याच्या उत्पादनाबद्दल बोलायचे झाले तर चीन नंतर भारत या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ब्रोकोलीला थंड आणि दमट हवामानाची आवश्यकता असते. दिवस तुलनेने कमी असतील म्हणजेच हिवाळ्याच्या दिवसात ब्रोकोलीच्या फुलांची वाढ जास्त होते. फुल निघण्याच्या वेळी उच्च तापमानामुळे फुले खवलेदार, पाणीदार आणि पिवळे होतात. ब्रोकोलीचे पीक हे कोणत्याही जमिनीत घेतले जाऊ शकते. हे हलक्या जमिनीतही येऊ शकते. मात्र त्यात पुरेशा प्रमाणात शेणखत किंवा इतर सेंद्रिय खताचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. परंतु शेती विशेषज्ञ ब्रोकोलीची शेती करण्यासाठी वाळूयुक्त चिकन माती असलेली जमीन उपयुक्त असल्याचा नमूद करतात. उत्तर भारतात खास करून मैदानी प्रदेशात हिवाळ्याच्या दिवसात ब्रोकोली लागवडीच्या सल्ला दिला जातो. याच्या व्यवस्थित वाढीसाठी व गडाच्या चांगल्या पोषणासाठी तापमान 21 ते 26 डिग्री सेल्सिअस दरम्यान असावे. असे मार्गदर्शन कृषी वैज्ञानिक वारंवार शेतकऱ्यांना करत असतात.      ब्रोकोलीची फ्लावर प्रमाणे रोपवाटिका तयार करावी लागते आणि ब्रोकोलीची रोपवाटिका तयार करण्यासाठी योग्य वेळ ही ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात असते. पर्वतीय प्रदेशात ब्रोकोलीची ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात रोपवाटिका तयार करावी

👉👉More Updates Join Whatsapp Group👌👌

Planting broccoli

Leave a Comment