पेरूच्या विविध जातीDifferent Varieties Of Guava best 4

Different Varieties Of Guava

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पेरूच्या विविध जातींबद्दल. पेरू हे एक गोड तसेच आंबट फळ म्हणून ओळखले जाते. जे की या फळाची झाडे उष्ण हवामानात वाढत असतात. पेरूचा रंग आत मधून पांढरा किंवा लालसर असतो. जर कच्चा पेरू असेल तर त्याचा आतील गाभा सुद्धा परिपक्व झालेला नसतो. परिपक्व असलेला पेरूचा बाहेरचा रंग पिवळा तर आत मधून गाभा मऊ झालेला असतो आणि त्याची चव सुद्धा गोड असते . अनेक पक्षी जास्तीत जास्त पेरू खाण्याकडे लक्ष देत असतात.  पेरू खाण्याचे बरेच फायदे आहेत म्हणूनच या फळाला आपल्या आहारात समाविष्ट करून घेणे फायद्याचे ठरू शकते.

पेरूचे आरोग्यवर्धक फायदे :-

विटॅमिन C :-पेरूमध्ये विटॅमिन C चांगल्या प्रमाणात आढळते, ज्यामुळे इम्यून सिस्टिमला मजबूत बनवण्यासाठी तसेच अँटीऑक्सीडन्ट म्हणून काम करण्यासाठी मदत करते.

फायबर्स: पेरूमध्ये फायबर्सचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे पचनसंस्थेला मदत तर होतेच शिवाय कब्ज देखील टाळता येतो.

कमजोरी कमी करणे : पेरू मधील पोटॅशियम आणि फायबर्स शरीरातील पाण्याच्या संतुलनाचे व्यवस्थापन करतात आणि हृदयाच्या आरोग्याला समर्थन देतात.

हृदयाचे स्वास्थ्य: पेरूमधील अँटीऑक्सीडन्ट्स आणि फॅट्स, कमी असलेले अन्न हृदयाच्या रोगांपासून संरक्षण करण्यात मदत करतात.

वजन कमी करणे: कमी कॅलोरीज आणि उच्च फायबर्सच्या उपलब्धतेमुळे पेरू वजन कमी करण्यात मदत करू शकते.

त्वचेचे आरोग्य: पेरूमधील अँटीऑक्सीडन्ट्स आणि पाणी त्वचेच्या आरोग्याला मदत करतात आणि त्याला चमकदार ठेवतात.

हड्ड्यांचे स्वास्थ्य: पेरूमध्ये कमी प्रमाणात कॅल्शियम असले तरी देखील ते हड्ड्यांच्या आरोग्याला मदत करण्यास सक्षम आहे .

👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌

Different Varieties Of Guava

पेरूच्या विविध जाती:-

1) पिंक तैवान पेरू:-
बाजारात सध्या ग्राहकांची आणि व्यापारी वर्गाची जास्तीत जास्त मागणी असलेला पेरू म्हणजे पिंक तैवान पेरू. साधारणपणे या पेरूचे वजन 500 ग्रॅम असते. जे की आकाराने हा पेरू मोठा असतो. या पेरूची वैशिष्ट्य म्हणजे आत मधून हा फिकट गुलाबी रंगाचा असतो. जो की चवीला एकदम गोड आणि रुचकर असतो. शेतकऱ्यांनी या प्रकारच्या पेरूंची बाग लावून जास्तीत जास्त उत्पादन मिळवावे. कारण या प्रकारच्या पेरूला भाव सुद्धा चांगल्या प्रकारे भेटतो.

2 लखनवी पेरू:-
बाजारात चांगल्या प्रमाणे मागणी असलेला पेरू म्हणजे लखनवी पेरू. लखनवी पेरू हा पिंक तैवान पेरू पेक्षा सर्वसाधारण गोड स्वरूपाचा आहे. मागील काही वर्षांपासून लखनवी पेरूला चांगली मागणी असल्याचे बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले. लखनवी पेरूची भाजी सुद्धा केली जाते. जे की ही भाजी चवीला सुद्धा स्वादिष्ट असते गोवा राज्यात लखनवी पेरू पासून आईस्क्रीम तसेच नाताळच्या दिवशी बर्फी करून वाटली जाते.

3 बनारसी:-
बनारसी हे पेरूची जात अत्यंत गोड असते जे की कमी प्रमाणात आंबट असते. या जातीची झाडे सुद्धा जोमाने वाढतात. तसेच त्यांची उंची पाच ते साडेपाच मीटर असते. या जातीचे फळे गोल्ड आकाराची व पिवळ्या रंगाचे असतात. टिकायला सुद्धा या जातीचे फळ मध्यम असते.

4 हरिझा :-

हरिझा या जातीचे फळ मोठ्या प्रमाणात उत्पादन देते. या जातीचे झाड सर्वसामान्य साडेतीन मीटर एवढ्या उंचीचे असते. या जातीची फळे हिरवट तसेच पिवळ्या रंगाची असतात . हरीझा ही जात गोड असते तसेच टिकण्यास सुद्धा मदत करते.

👉👉More Updates Join Whatsapp Group👌👌

Benefits of bacterial slurry

5 लाल पेरू:-
लाल पेरू या जातीच्या आकाराची फळे मध्यम आकाराचे असतात. जसे की या जातीची फळे उत्तर कोकण आणि मुंबईच्या भागात आढळतात या जातीच्या फळाचा गर कडक असतो.

Different Varieties Of Guava

Leave a Comment