Profitable Dairy Business
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कशाप्रकारे मुक्त संचार गोठा हा दूध उत्पादना साठी फायदेशीर ठरेल. शेतकरी वर्गाला आर्थिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी दुधाचा व्यवसाय मदत करतो. जे की या व्यवसायामुळे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती चांगली झाली असली तरी मागील काही वर्षात शेतकऱ्यांनी हा व्यवसाय कमी तर काही शेतकऱ्यांनी हा व्यवसाय थांबवलाच आहे. या व्यवसायाला मुक्त संचार गोठा हा पूरक आणि चांगला ठरलेला आहे.
👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌
Profitable Dairy Business
मागील काही वर्षात राज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या घरासमोर जरशी तसेच होस्टेल अशा विदेशी जातीच्या गाई उभे राहिल्या. त्यामुळे जो मुक्त संचार गोठा होता तो गोठा बंदिस्त झाला. आणि यामुळे व्यवस्थापन खर्च देखील वाढला. तसेच पशुखाद्याचा खर्च सुद्धा तितकाच वाढला गेला. मागील काही वर्षांपासून पशुखाद्याच्या किमतीचे भाव पार आभाळाला टेकले आहेत. आणि दुधाचे भाव कमी होत गेले. त्यामुळे दूध व्यवसाय हा तोट्याचा व्यवसाय झाला. अनेक शेतकऱ्यांना खाद्य पैसेच भेटत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांनी व्यवस्थापन खर्च कमी केलेला आहे.
यासाठी व्यवस्थापनाचा खर्च कमी व्हावा म्हणून शेतकरी बांधवांनी मुक्त संचार गोठा संकल्पना अवलंबवावी. यातून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळू शकते. साध्या पद्धतीच्या गोठा व्यवस्थापनामध्ये माणसं सुद्धा जास्त लागतात.
तसेच दिवसातून त्यांना तीन ते चार वेळा खायला टाकावे लागते. तसेच पाणी देणे , स्वच्छता करणे यासाठी मोठे मनुष्यबळ आणि वेळ सुद्धा जात असतो. एवढे सगळे करण्यासाठी व्यवस्थापन खर्च जास्त प्रमाणात लागत असतो. त्यासाठीच मुक्त संचार गोठ्याची संकल्पना अमलात आणली पाहिजे. अंदाजे सहा गाईंसाठी व्यवस्थापन खर्च जितका प्रमाणात लागतो तेवढ्यात शंभर गायींचे व्यवस्थापन होऊ शकते आणि दूध व्यवसाय देखील फायद्यात राहतो.
👉👉More Updates Join Whatsapp Group👌👌