सेंद्रिय द्रव रूप स्वरूपात जैविक खत कसे तयार करावेOrganic fertilizer in liquid form Best 0

Organic fertilizer in liquid form

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत, जीवामृत: सेंद्रिय द्रवरूप जैविक खत तयार करण्याच्या काही पद्धती. पिकांच्या वाढीसाठी जमिनीमध्ये सूक्ष्मजीवाणू अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतात. त्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्यासाठी जीवामृत चा वापर करावा.
मातीही त्यातील सूक्ष्मजीवांच्या संख्या योग्य असल्यास जिवंत मानली जाते. हे जिवाणू जमिनीतील सुपीकता वाढवण्यासाठी कार्यरत असतात. आणि त्यासाठीच खालील मुद्द्यांवर आपण काम केले पाहिजे.

१) जमिनीतील जिवाणूंची व नैसर्गिक गांडुळांची संख्या वाढवणे.

२) जमीन सजीवांनी समृद्ध करणे. 3 जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवणे.

4) पिकांची व मुळांची वाढ होणे.

5 जमिनीतील अन्नद्रव्य पिकांना उपलब्ध करून देणे.

6) रासायनिक खतांवर होणारा खर्च कमी करणे.

शेताला जीवामृता पासून मिळणारे गुणधर्म:-

१) जीवामृताचे नत्राचे प्रमाण तीन ते सहा टक्क्यांपर्यंत असते.
२) जीवामृताचा सामू आम्लधर्मी असतो.
3) जीवामृताचा रंग तांबडा काळसर असतो.
4) सूक्ष्म जिवाणूंच्या निरनिराळ्या प्रजातींच्या वाढीसाठी जीवामृत्यू उत्कृष्ट अन्नस्त्रोत आहे.
5) जीवामृतातील सूक्ष्मजीवाणू हवेतील नत्र शोषून घेतात. त्यातील कर्ब व नत्रांचे गुणोत्तर कमी होते.
6) जीवामृत द्रवरूप असल्याने जिवाणूंची संख्या व टिकण्याचा कालावधी वाढतो.
7) जीवामृत जास्तीत जास्त 30 दिवसांच्या आत वापरावे.

Organic fertilizer in liquid form

जीवामृता पासूनपासून मिळणारे फायदे:-

1सेंद्रिय शेती पद्धतीत सेंद्रिय घटकांचा वापर वाढल्यावर जिवाणूंना खाद्य उपलब्ध होते. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते.
2 शेतीत गांडुळांची संख्या वाढल्याने जलधारण क्षमता वाढते.
3 सेंद्रिय पदार्थामुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो. पावसाच्या खंड काळातही झाडे तग धरून राहतात.
4 जीवामृताचा वापर केलेल्या शेतातील भाजीपाला व फळांची प्रत ही सर्वोत्तम मिळू शकते. साठवण क्षमता चांगली राहते. त्याशिवाय चवही उत्तम होते.
5 जीवामृताच्या वापरामुळे कमी खर्चात चांगले उत्पादन मिळण्यास मदत होते.
6 जमिनीत सर्व पिकांना लागणारा अन्नद्रव्यांच्या साठा मुबलक असला तरी तो पिकांना उपलब्ध स्वरूपात असत नाही. जमिनीमध्ये विषाणू असल्यास ते आपल्या जीवन चक्रातून पिकाला जमिनीतून किंवा वातावरणातून योग्य वेळी उपलब्ध करून देतात. परिणामी पांढऱ्या मुळांची संख्या व आकार वाढतो. जीवामृताच्या वापराने जमिनीतील जिवाणूंची संख्या मोठ्या पटीत वाढवता येते.

त्यांची संख्या वाढल्यामुळे हवेतील नत्र शोषून घेण्याचे प्रमाण वाढते. पिकांना नत्र व इतर अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. त्यामुळे शाकीय वाढ जोमाने होते. पीक तजेलदार, टवटवीत व निरोगी राहते.

👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌

जीवामृत बनवण्याची पद्धत:-

जीवामृत तयार करण्यासाठी 200 लिटर क्षमतेचे प्लास्टिक बॅरल किंवा सिमेंट टाकीमध्ये 170 लिटर स्वच्छ पाणी घ्यावे. त्यात दहा किलो शेण, दहा लिटर गोमूत्र, दोन किलो काळा गूळ, दोन किलो बेसन, दोन किलो जिवाणू माती व 100 ग्रॅम उपलब्ध जीवाणू संवर्धन मिसळावे. डावीकडून उजवीकडे दररोज दहा ते पंधरा मिनिटे दोन ते तीन वेळा ढवळावे. सात दिवसांत पिकांना देण्यासाठी जीवामृत तयार होते. एका एकराला २०० लिटर जीवामृत पुरसे होते. जास्त क्षेत्र असल्यास बॅरल ची संख्या वाढवावी किंवा हजार लिटर क्षमतेच्या टाक्यांमध्ये वरील प्रमाण पाचपट करून मिश्रण तयार करावे. गोमूत्राची उपलब्धता जास्त असल्यास पाण्याचे प्रमाण कमी करावे.

जीवामृत वापरण्याची पद्धत:-

1) जीवामृत वापरत असताना जमिनीत ओलावा असल्यास विशेष फायदेशीर असते.
2) जमिनीत ओलावा असताना कडूनिंबाच्या डहाळीने किंवा साध्या फवारणी यंत्राने पिकांच्या ओळीत जमिनीवर शिंपडावे.
3) बी टोकून पेरलेल्या पिकांना ( उदाहरणार्थ कापूस,मिरची केळी, पपई, ई) यांच्या बुडाशी भांडाने झाडाच्या एक आकारमानाप्रमाणे 250 ते 500 मिली या प्रमाणात प्रति झाड टाकावे.
4) पिकांना ओलीत देताना मुख्य चारित बारीक धार धरावी. हे पाणी पुढे सरित जाऊन पिकांचे मुळापाशी जाते.
5) ठिबक सिंचन पद्धतीने जीवामृत देताना चांगल्या प्रकारे गाळून घ्यावे लागते. अन्यथा लॅटरल व इमिटर बंद होऊ शकतात.
6) जीवामृत वस्त्रगाळ करून त्याची फवारणीही करता येते.

👉👉More Updates Join Whatsapp Group👌👌

Organic fertilizer in liquid form

Leave a Comment