जमिनीची सुपीकता कशी वाढवालHow To Increase Soil Fertility0

How To Increase Soil Fertility

माती परीक्षण आवश्यक:-

नमस्कार मित्रांनो , आज आपण पाहणार आहोत शेती करत असताना जमिनीची सुपीकता कशी वाढवावी . जमिनीच्या भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्मावर व अन्नद्रव्य पुरवठा क्षमतेवर सुपीकता ठरविले जाते. सूक्ष्मजीवाणू व गांडूळ यांच्या कार्यक्षमतेनुसार जमिनीचे सर्व गुण बदलतात. प्रत्येक कृषी हवामान विभागातील जमिनीची गुणधर्म वेगळे असतात. जमिनीची चाचणी केल्याशिवाय तिच्या गुणधर्माचे व दोघांचे स्वरूप कळत नाही. गुणधर्म व दोष कळाल्याशिवाय जमीन व पीक नियोजनाचा आराखडा तयार करता येत नाही. आराखडा तयार केला नाही तर जमिनीची पीक उत्पादन क्षमता वाढवता येणार नाही. त्यामुळे माती परीक्षण तितकेच गरजेचे आणि आवश्यक आहे.

जमिनीची प्रत किंवा सुपीकता पातळी:-

जी जमीन पूर्णपणे सजीव आहे तिच्यात कमीत कमी दोष व जास्तीत जास्त उपयुक्त गुण आहेत तसेच पीक वाढीस अतिशय पोषक वातावरण आहे अशा जमिनीला उत्कृष्ट प्रतीची म्हणता येईल.
जमिनीची गुणधर्म व पिक उत्पादन संबंध जमिनीचा सामू व क्षारतेचे प्रमाण यावरून तिच्यातील अन्नद्रव्य पुरवठा क्षमतेची कल्पना येते. सेंद्रिय कर्बाचा प्रमाणावरून जमिनीची घडन, जलतरण क्षमता, निचऱ्याचे प्रमाण, जीवाणूच्या कार्यक्षमतेची पातळी यांची कल्पना येते. भौतिक गुणधर्मावरून पोत , मुळांच्या वाढीस अनुकूल वातावरण याची कल्पना येते. जैविक गुणधर्मावरून जमिनीतील अन्नद्रव्य पुरवठ्याचे प्रमाण व वेग , सेंद्रिय पदार्थाचे विघटनाचा वेग व त्याचा भौतिक व रासायनिक गुणधर्मावर होणारा परिणाम याची कल्पना येते.

जमिनीची सुपीकता पातळी वाढली की पीक उत्पादन पातळी आपोआप वाढते तसेच जमिनीतील सेंद्रिय गर्भाचे प्रमाण वाढले की त्या प्रमाणात पीक उत्पादन पातळी वाढते. क्षारयुक्त जमिनीत पीक उत्पादन घटते. चुनखडीच्या जमिनीत स्फुरद व सूक्ष्म अन्नद्रव्य पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. जमीन घट्ट असेल किंवा फार उथळ असेल तर पिकांची मुळे फार खोलवर जाऊ शकत नाहीत. परिणामी पाणी व अन्नद्रव्य शोषणावर प्रतिकूल परिणाम होऊन उत्पादन घटते.

वरील निष्कर्षावरून स्पष्ट होते की, पिक उत्पादनाच्या दृष्टीने जमीन सुस्थितीत असणे अत्यंत आवश्यक आहे. नसेल तर नियोजनाच्या माध्यमातून तिच्यात अपेक्षित बदल करणे गरजेचे आहे.
गांडुळे ही जमिनीत नैसर्गिकरीत्या सेंद्रिय खत निर्माण करणारे कारखानदार आहेत. जमिनीचे आरोग्य शाश्वत पीक उत्पादनासाठी जमिनीतील सेंद्रिय पदार्थांची पातळी दोन टक्क्यांच्या वर राहील याची सतत काळजी घेण्याची गरज आहे. ज्यांच्या जमिनी खराब झालेले आहेत किंवा खराब होण्याचे मार्गावर आहेत त्यांनी वरील माहितीचा जास्तीत जास्त उपयोग करावा.

👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌

How To Increase Soil Fertility

सुपीकता नियोजनाची तत्वे

जमिनीची उत्तम भौतीक स्थिती, जमिनीतील आद्रतेचे योग्य प्रमाण, वरखतांचा संतुलित वापर, अनुकूल हवामान व वेळेवर मशागत या पंच सूत्रांचा अवलंब केल्यास जमिनी सुपीकता पातळी टिकून राहते. पीक उत्पादन पातळी वाढण्यास मदत होते.
विशिष्ट परिस्थितीत क्षारता व चोपण पणा होणार नाही याची काळजी घेणे, ओलिता साठी खारे किंवा मधुळ पाणी न वापरण्याचा निर्धार, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा गरजेनुसार वापर, क्षारता व चोपण पणा सहनशील वाणांची निवड या गोष्टी करावे लागतील.

सुपीकता पातळी वाढवण्याचे मार्ग, भरखतांचा भरपूर प्रमाणात वापर, पिकांची फेरपालट व फेरपालटीत द्विदल पिकांचा समावेश, योग्य वेळी व योग्य प्रमाणात जमिनीची पूर्व मशागत, जैविक खतांचा वापर, सूक्ष्म अन्नद्रव्यांचे शक्यतो सेंद्रिय खतांबरोबर वापर, माती परीक्षणानुसार रासायनिक खतांचा वापर, क्षारयुक्त व चोपण जमिनीत भूसुधारकांचा वापर, सेंद्रिय स्वरूपात नत्राचा पुरवठा, सेंद्रिय तसेच एकात्मिक शेतीबद्दलचा अवलंब, मृदसंधारणाची वेळोवेळी कामे, पाणलोट क्षेत्र विकासाची कामे, कंपोस्ट खत, गांडूळ खत, हिरवळीचे खत, आच्छादन तंत्राचा वापर, जमिन निचरा व्यवस्था, जैविक कीटकनाशकांचा जास्तीत जास्त वापर, तसेच जमिनीतून निघणारे सेंद्रिय पदार्थ जाळून न टाकता शेतातच पुनर्वापर करावे.

👉👉More Updates Join Whatsapp Group👌👌

Leave a Comment