Medicinal Benefits Of Brahmi Plant
नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ब्राह्मी वनस्पती पासून आपल्याला कुठले फायदे मिळणार आहेत. सध्याच्या जगात परंपरागत पिके घेणे शेतकऱ्यांनी कमी करून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारची पैकी घेण्यात शेतकरी सध्या उत्साहीत आहेत. कमीत कमी वेळेत आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळावे अशा पिकांची निवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येतो. त्याचाच एक भाग म्हणून शेतकरी सध्या बऱ्याच प्रकारच्या औषधी वनस्पतींची लागवड करीत आहेत. या औषधी वनस्पतीच्या लागवडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाचे एक चांगला स्रोत मिळाला आहे. अशाच एका वनस्पती औषधी ची आपण माहिती घेणार आहोत. त्याचे नाव आहे ब्राह्मी. या औषधी वनस्पतीची शेती केल्यास शेतकऱ्यांना तीन पट नफा मिळू शकतो. आयुर्वेदात ही वनस्पती अतिशय महत्त्वाची असे मानली जाते. ब्राह्मी वनस्पती दोन ते तीन फूट उंच वाढते आणि त्याची मुळे ढेकळामधून पसरतात. भारताव्यतिरिक्त उत्तर व दक्षिण अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका या देशांमध्ये हि लागवड केली जाते.
ब्राह्मी या औषधी वनस्पतींची लागवड कशी करावी:-
या औषधी वनस्पतींची लागवड करण्यासाठी शेताची चांगली नांगरट करून काही दिवस ते तसेच पडू द्यावे. त्यानंतर त्या शेतामध्ये सेंद्रिय खत मिसळले जाते. रोपांच्या लागवडीनुसार शेतात सरी व बांध तयार केले जातात. याच्या वनस्पतींना रोपट्यांची या स्वरूपात लावणे फायदेशीर असते. आधी तयार केलेल्या कॅरीमध्ये याच्या बिया पेरल्या जातात. त्यानंतर याची वनस्पती तयार झाल्यानंतर याची कटिंग ट्रे मध्ये लावून रोपे बनवली जातात. त्यानंतर ते शेतात लावली जातात. त्याच्या झाडा च्या काठावर अर्धा फूट अंतरावर लागवड केली जाते. तयार केलेल्या प्रत्येक बांदा दरम्यान अंतर सुमारे 25 ते 30 cm असावी. ब्राह्मी ची लागवड पावसाळी हंगामात करावी. या औषधी वनस्पती चांगल्या उत्पादनासाठी पीक तणमुक्त ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी वेळेत खुरपणी करावी जेणेकरून वनस्पतीच्या वाढीवर परिणाम होणार नाही. लागवडीनंतर चार महिन्यांनी ब्राह्मीची काढणी केली जाते.
ब्राह्मी औषधी वनस्पतीची कापणी:-
Medicinal Benefits Of Brahmi Plant
👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌
या वनस्पतीची कापणी खोडापासून चार ते पाच सेंटीमीटर वर करतात. उर्वरित भागात पुन्हा वाढ होते. कापणी नंतर त्याची व्यवस्थित पॅकिंग करून बाजारात नेता येते. एका हेक्टर मध्ये कमीत कमी ब्राह्मीची 25 ते 30 क्विंटल सुकी पाने मिळतात. याचे पीक तीन ते चार वेळा घेता येते. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीपेक्षा कमीत कमी तीन ते चार पट अधिक पैसे मिळतात. जास्त उत्पन्नासाठी आपण ति थेट बाजारात न विकता तिचे पाने भुकटीच्या रूपात विकू शकतात. तो चांगला नफा मिळू शकतो.
ब्राह्मीचे आरोग्यदायी फायदे:-
1)ब्राह्मीचे पाने बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करतात.
2)तसेच ब्राह्मीचे रस संधिवातावर यशस्वी उपचार आहे.
3)या वनस्पतीत रक्त शुद्धतेचे गुणधर्म आहेत.
4)ब्राह्मी वनस्पतीमुळे बुद्धीला चालना देते आणि स्मरणशक्ती वाढण्यास देखील मदत करते.
5)ब्राह्मी पासुन बनवलेली औषधे कर्करोग, अशक्तपणा, दमा, मिरगी आणि मूत्रपिंडाच्या विकारांवर उपचार मध्ये वापरले जाते.
6)सर्पदंशावर देखील याचा उपयोग होतो.
👉👉More Updates Join Whatsapp Group👌👌